
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) देहरादून विभागाने जनसंपर्क विषयावर आधारीत विशेष सत्राचे आयोजन केले होते. या सत्राचा विषय सकारात्मक विचार आणि सजग मन हाच जनसंपर्काचा प्रभावी मूलमंत्र असा होता. हे चर्चासत्र हडको कार्यालय, राजपुर रोड हडको आणि आर्ट ऑफ लिविंगच्या सहयोगाने पार पडले.
या सत्रात प्रमुख अतिथी श्वेता गोलानी होत्या. गोलानी या आर्ट ऑफ लिविंगच्या वरिष्ठ शिक्षिका तसेच उत्तराखंड सरकारसाठी एक्जीक्यूटिव प्रोग्राम (GEP) च्या राज्य निदेशक आहेत. त्यांनी ध्यान आणि मानसिक शांतिचे महत्त्व आणि गरज यावर प्रकाशझोत टाकला. तसेच संतूलनपूर्ण मन असेल तर जनसंपर्क क्षेत्रात सकारात्मकता निर्माण केली जाऊ शकते असे त्या म्हणाल्या. तसेच, आर्ट ऑफ लिविंगच्या कार्याविषयीही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.