evm
evmMedia Gallery

प्रसिद्धीसाठी याचिका; हायकोर्टाने EVM ला विरोध करणाऱ्यांना फटकारले

Published on
Summary

देशात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्याची मागणी यामध्ये केली होती.

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनचा वापर बंद करण्याबाबत आणि पुन्हा मतपत्रिकांच्या वापरासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. देशात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्याची मागणी यामध्ये केली होती. हायकोर्टाने मंगळवारी ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुख्य न्यायाधीश डीएन पटेल आणि न्यायाधीश ज्योति सिंह यांच्या पीठाने सांगितलं की, वकील सी आर जया सुकीन यांची याचिका केवळ पब्लिसिटीसाठी असून ती अफवा आणि तथ्यहीन आरोप, अंदाज यावर आधारीत आहे. न्यायालयाने सांगितलं की, याचिकाकर्त्यांनी ईव्हीएमच्या कामकाजावर कोणत्याही प्रकारे ठोस अशी माहिती दिली नाही. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.

evm
Pegasus प्रकरणी आता एडिटर्स गिल्डची सुप्रीम कोर्टात धाव; SIT तपासाची मागणी

दाखल करण्यात आलेली याचिका ही चार कागदपत्रांवर आधारीत होती. यामध्ये एक बातमी होती तर इतर उच्च न्यायालयात याच्याशी संबंधित याचिका होत्या. याचिकाकर्त्याला स्वत:ला ईव्हीएमबाबत काही माहिती नव्हती. न्यायालायने म्हटलं की, याचिकाकर्त्याने बातमी वाचली, त्यानंतर ईव्हीएम आणि त्याचे काम न पाहताच याचिका दाखल केली. ज्याला निवडणूक आयोगासह संसदेनेसुद्धा वापरास मंजुरी दिली आहे.

evm
'पनौती'मुळे हरलो! पराभवाला नेटकऱ्यांनी मोदींना धरलं जबाबदार

याचिकाकर्ता नवीन माहिती घेऊन आणि योग्य तर्कांसह नव्याने याचिका दाखल करू शकतो असंही न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच याचिका 10 हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईसह फेटाळून लावली जात आहे. दंड चार आठवड्याच्या आत जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com