पुद्दुचेरीत फेसबुक, व्हॉटसऍपवरील संवाद 'ऑफिशीअलच'!

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पुद्दुचेरी : कार्यालयीन कामकाजासाठी संवादाचे साधन म्हणून फेसबुक, व्हॉटसऍपसारख्या सोशल मिडियचा वापर करता येणार नसल्याबाबत पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी काढलेले परिपत्रक नायब राज्यपाल किरण बेदी यांनी रद्दबातल ठरविले आहे.

पुद्दुचेरी : कार्यालयीन कामकाजासाठी संवादाचे साधन म्हणून फेसबुक, व्हॉटसऍपसारख्या सोशल मिडियचा वापर करता येणार नसल्याबाबत पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी काढलेले परिपत्रक नायब राज्यपाल किरण बेदी यांनी रद्दबातल ठरविले आहे.

बेदी यांनी ट्‌विटरद्वारे हे परिपत्रक रद्द करत असल्याचे निर्णय जाहीर केला आहे. "पुद्दुचेरी हा पुरोगामी केंद्रशासित प्रदेश असल्याने तेथील संवाद प्रक्रिया प्रतिगामी करता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आदेश रद्द करण्यात येत आहे', अशा शब्दांत परिपत्रक रद्द केल्याचे बेदी यांनी जाहीर केले. दोन डिसेंबर रोजी पुद्दुचेरीतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजातील संवादासाठी सोशल मिडियाचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामागे फेसबुक, व्हॉटसऍपसारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांचे सर्व्हर्स हे देशाबाहेर असल्याचे कारण देण्यात आले होते.

"सोशल मिडियाचा कार्यालयीन संवादासाठी वापर केल्याने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा तसेच गोपनीय कायद्याचा भंग होतो. याबाबीचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी प्रकर्षाने काळजी घ्यावी. जर कोणीही याबाबीचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ज्याठिकाणी टाळता येणार नाही आणि अत्यावश्‍यकच आहे अशा ठिकाणी मुख्य सचिवांची लेखी परवानगी घेऊन शासकीय कामकाजासाठी सोशल मिडियाचा वापर करता येईल', असे परिपत्रक मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारी 2017 रोजी काढले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Puducherry Gov. Bedi 'voids' CM's circular banning social media for official communication