पल्स मीटर खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप 

वृत्तसंस्था
Monday, 14 September 2020

अनेक जिल्ह्यांमध्ये ग्राम पंचायतींनी पल्स मीटर, थर्मामीटर अशा वैद्यकीय साहित्याच्या केलेल्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला असून हे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशात गाजत आहे.

लखनौ - अनेक जिल्ह्यांमध्ये ग्राम पंचायतींनी पल्स मीटर, थर्मामीटर अशा वैद्यकीय साहित्याच्या केलेल्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला असून हे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशात गाजत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशी समितीही स्थापन केली आहे. या गैरव्यवहारावरून सोशल मीडियामध्ये राज्य सरकारवर टीका होत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वत्र कामाच्या ठिकाणी प्रवेश करताना शरीराचे तापमान आणि नाडीचे ठोके मोजले जतात. हे मोजणाऱ्या उपकरणांना प्रचंड मागणी आहे. राज्यातील सुलतानपूर आणि गाझीपूरसह काही जिल्ह्यांमधील ग्राम पंचायतींनी बाजारभावापेक्षा अधिक दराने पल्स मीटर आणि इन्फ्रारेड ऑक्सिमीटर या उपकरणांची खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. यावरून सोशल मीडियवार मोठी टीका झाल्यानंतर आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वीच चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. ही समिती दहा दिवसांमध्ये सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे. सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन करणार नसून गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आदित्यनाथ यांनी दिला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulse Oximeter Shopping scam accused