Pulwama terror attack: 'त्या' दहशतवाद्याचा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादयांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यातील आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविणारा आदिल दर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आज (गुरुवार) केलेल्या हल्ल्यात 30 जवान हुतात्मा झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 2004 नंतर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा एवढा मोठा हल्ला घडवला आहे. उरीनंतरचा हा भारतावरचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा 2016नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली मोटार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवून आणला. आदिल दर याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. आत्मघातकी दहशतवादी म्हणून सहभागी झालेल्या आदिल दर याने हल्ल्यापूर्वी काही वेळ आधीच हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, या हल्ल्यासाठी मागील एक वर्षापासून तयारी सुरु होती. यामध्ये तो काश्मीरी मुस्लिमांच्या अॅट्रॉसिटीच्या मुद्द्यांवर बोलत आहे. या व्हिडियोमध्ये आदिलच्या हातात एक रायफल असून, त्याच्या मागे जैश-ए-मोहम्मदचा बॅनर दिसत आहे. या हल्ल्यात लष्कराच्या एक डझनहून अधिक वाहनांवर हल्ला करण्यात येणार असल्याचे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अधिकृत व्यक्तीकडून सांगण्यात आले. आज झालेल्या हल्ल्यात 50 हून अधिक वाहनांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama terror attack jaish e mohammad adil ahmad dar suicide bomber video