esakal | पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला; पोलिस हुतात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

pulwama terrorist attack cop martyred and two others injured

जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या पुलवामा भागात पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी आज (गुरुवार) दुपारी हल्ला केला आहे. या हल्ल्यात पोलिस हुतात्मा झाला असून, अन्य दोघे जण जखमी झाले आहेत.

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला; पोलिस हुतात्मा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या पुलवामा भागात पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी आज (गुरुवार) दुपारी हल्ला केला आहे. या हल्ल्यात पोलिस हुतात्मा झाला असून, अन्य दोघे जण जखमी झाले आहेत.

हेल्मेट ओळखणार कोरोनाची लक्षणं...

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाला आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एकत्रित टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिस हुतात्मा झाला असून, दोघे जण जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराने परिसर ताब्यात घेतला आहे. घाटीत सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दलांवर हल्ला झाला आहे.