Rahul Gandhi
Rahul Gandhiesakal

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Rahul Gandhi : पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी राहुल गांधींनी सुरुवातीलाच मीडियाला धारेवर धरलं. त्यानंतर त्यांनी मोदींना आरक्षणावरुन एक प्रश्न उपस्थित केला.

राहुल गांधी म्हणाले की, आजची लढाई ही संविधान वाचवण्यासाठीची लढाई आहे. एकीकडे इंडिया अलायन्स संविधान वाचवण्यासाठी लढत आहे. तर दुसरीकडे भाजप, नरेंद्र मोदी आणि आरएसएस संविधान संपवायला निघाले आहेत. यावेळी राहुल गांधींच्या हातात संविधानाची प्रत होती.

''जे मुलभूत हक्क आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेत, जे हक्क महात्मा गांधींनी मिळवून दिलेत ते कधीही संपवू देणार नाही. त्यामुळे आम्ही कधीही संविधान बदलू देणार नाहीत. ''

राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. आरक्षणाची जी पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे, त्यावर त्यांची भूमिका काय? त्यांनी त्यांच्या भाषणात याबाबत बोललं पाहिजे. मात्र आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवणार आहोत.

''देशामध्ये दलित, आदिवासी, ओबीसींचे प्रश्न आहे. ते प्रश्न मीडियावाले दाखवणार नाहीत. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न हे लोक दाखवणार नाहीत. हे फक्त अंबानीचं लग्न दाखवतील. कुणी किती महागडे कपडे घातले, हे दाखवण्यात मीडियाला रस आहे.'' असा आरोप राहुल गांधींनी माध्यमांवर केला.

Rahul Gandhi
रिमोट कंट्रोलचा प्रश्नच नाही, दोन्ही उमेदवार दिग्गज; राहुल गांधी स्पष्टच बोलले

मोदी भाषणात यांच्याविषयी बोलत नाहीत...

राहुल गांधींनी आरोप केला की, पंतप्रधन नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणांमध्ये कधीच शेतकरी, मजूर, बेरोजगारांविषयी बोलत नाहीत. त्यांनी एअरपोर्ट, डीफेन्स सेक्टर सर्व आदानींना दिलं आहे. यावर पण मिडीया बोलत नाही. ⁠इलेक्टोरल बाँड सुप्रिम कोर्टान रद्द केले, पण त्यावरही ते बोलत नाहीत असा घणाघात राहुल गांधींनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com