Latest Marathi News Live Update : दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवरती

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० हून अधिक गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसंच त्यांनी आज एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

डोंबिवलीच्या कारखान्यातील बॉयलरला परवानगी नव्हती, दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर

डोंबिवलीच्या कारखान्यातील बॉयलरला परवानगी नव्हती अशी माहिती आता समोर आली आहे. कामगार विभागाने याबबातची धक्कादायक माहिती दिली आहे. सखोल चौकशीनंतर अतिरिक्त माहिती दिली जाणार आहे.

Prajwal Revanna : खासदार प्रज्वल रेवण्णांचा पासपोर्ट रद्द करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाकडे प्रस्ताव

नवी दिल्ली : शेकडो महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या कर्नाटकातील JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा पासपोर्ट रद्द करण्याचा प्रस्ताव परराष्ट्र मंत्रालयाकडे पोहोचला आहे. रेवण्णाचा पासपोर्ट लवकरच रद्द केला जाऊ शकतो, असेही संकेत मिळाले आहेत.

Lok Sabha Election : सहाव्या टप्प्यात बिहारमधील आठ जागांवर एकाच वेळी मतदान, नेपाळ-उत्तर प्रदेशच्या सीमेवर सतर्कता

पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी बिहारमधील आठ जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे. यातील अर्धा डझन जागा नेपाळ आणि उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून आहेत. याबाबत नेपाळ आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. या टप्प्यात 60 हजारांहून अधिक सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय 18 हजारांहून अधिक होमगार्ड निवडणूक ड्युटीसाठी तैनात करण्यात आले आहेत.

Kalyani Nagar Accident Case : विमाननगरमध्ये दोन बारवर कारवाई

वडगाव शेरी : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर आला असून अल्पवयीन तरुणांना दारू देणाऱ्या बारला आज विमाननगरमध्ये सील ठोकण्यात आले आहे. तर दुसऱ्या एका बारला नियम भंग केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज नगर रस्ता भागामध्ये कारवाई करण्यात आली.

म्हाळुंगे-वाकड मार्गावरील मुळा नदीजवळील दुकानांना अचानक लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

म्हाळुंगे-वाकड दरम्यान मुळा नदीजवळ असलेल्या दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. आग कशाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अजून दोन गाड्या येत असल्याचे पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे अधिकारी सुजित पाटील यांनी सांगितले.

Chardham Yatra : चारधाम यात्रेवर पावसाचं संकट; मान्सूनपूर्व पावसाने उत्तराखंडमधील महामार्ग बंद

केदारनाथ-यमुनोत्री, बद्रीनाथ चारधाम यात्रा मार्गावरील हवामानाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. चारधाम यात्रेवर पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. गारपीट आणि मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो. दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसामुळे रस्ते बंद झाले असून पुलांचे नुकसान झाले आहे. बंद असलेले मार्ग खुले करण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासांत पौरी, उत्तरकाशी, पौडी आदी जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai Police : मुंबईतील माझगाव परिसरात दुचाकीच्या धडकेत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबईतील माझगाव परिसरात दुचाकीच्या धडकेत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत इरफान नवाब अली शेख नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जेजे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन डोंगरी बालगृहात पाठवले असून वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. जेजे मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३०४(२) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ३,४ नुसार गुन्हा दाखल केला.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर 64 जखमी

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीत आज दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर 64 जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Pune Accident Case : आरोपीच्या नातेवाईकांकडून पत्रकारांना शिवीगाळ, दमदाटी

कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपी विशाल अग्रवालच्या नातेवाईकांनी आधी पत्रकारांना शिवीगाळ केली, नंतर दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

West Bengal : हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, नंदीग्राममध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात

काल रात्री काही घरांवर हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर नंदीग्राममधील भाजप कार्यकर्त्यांनी आज आदल्या दिवशी निषेध केला आणि रस्ता अडवला. हा हल्ला टीएमसी कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप स्थानिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Dombivli MIDC Blast : अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करणार - डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivli MIDC Blast) अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

Dombivli MIDC Blast Update: डोंबिवलीतील स्फोटात सहा मृत्यू तर ३८ जण रुग्णालयात दाखल - देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीतील केमिकल कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत आतापर्यंत सहा जण मृत्यूमुखी पडले असून तब्बल ३८ लोकांना रुग्णालयात दाखल केलं आहे,अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Dombivli MIDC Blast : उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली जखमींची भेट; उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं दिलं आश्वासन

डोंबिवली MIDC येथे बॉयरलचा स्फोट झाल्याची दुःखद घटना घडली. या घटनेतील जखमींवर उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णाची भेट घेऊन विचारपूस केली. त्यांना धीर दिला असून उपचारासाठी लागणारा खर्च सरकारच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन दिले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मनसे चे आमदार राजू पाटील उपस्थित होते अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील कुंदेवाडी बंधाऱ्यात दोन मुले बुडाली

नाशिक येथील सिन्नर मधील कुंदेवाडी बंधाऱ्यात दोन मुले बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. एका मुलाचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले असून दुसऱ्याचा शोध घेणे सुरू आहे.

Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी स्फोटात तीन जणांचा मृत्यू; 35 ते 40 लोक जखमी

डोंबिवली एमआयडीसी स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या स्फोटात 35 ते 40 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी स्फोटात अडकलेल्या 8 लोकांना बाहेर काढण्यात आले; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली एमआयडीसी स्फोटा बाबत X वर पोस्ट केली आहे यात त्यांनी लिहिले की, ''डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.''

Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी स्फोटात 30 ते 35 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती

डोंबवलीतील एमआयडीसीमध्ये एकूण तीन स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटात 30 ते 35 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

Dombivli MIDC Blast: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे घटनास्थळी दाखल

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, आमदार निरंजन डावखरे, यांसह जिल्हाधिकारी डॉ. अशोक शिनगारे घटनास्थळी दाखल

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC BlastSakal

Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी स्फोटप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली स्फोटप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आहे.

Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली एमआयडीसीमध्ये एकूण तीन स्फोट

डोंबवलीतील एमआयडीसीमध्ये एकूण तीन स्फोट झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत ३५ ते ४० लोक जखमीं झाले आहेत.

Dombivli MIDC Blast Live Update: डोंबिवलीमध्ये अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल

डोंबिवलीमध्ये अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे आजुबाजुच्या घरातील काचा देखील फुटल्या आहेत. अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

Amit Shah: भाजपने आताच ३१० जागा मिळवल्या आहेत- अमित शहा

भाजपने पाच टप्प्यातील मतदान प्रक्रियेत ३१० जागा मिळवल्या आहेत. आता ४०० जागांच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असं अमित शहा म्हणाले आहेत.

Dombivli MIDC: डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मध्ये एका कंपनीत मोठा स्फोट

डोंबिवली एमआयडीसी मध्ये एका कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Sindhudurg News: सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

Pune News: अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केली- विशाल अग्रवाल

अल्पवयीन मुलाला गाडी देऊन मी चूक केली, अशी खंत आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल याने व्यक्त केली आहे.

सुरेंद्र अग्रवाल यांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी बालावले

अजय भोसले यांनी आरोप केल्यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले आहे

मुंबई कस्टम्सने 11.40 किलो सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू  केल्या जप्त

मुंबई कस्टम्सने एकूण 11.40 किलो सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या आहेत. 24 प्रकरणांमध्ये 7.46 कोटी. कपडे, सॅनिटरी पॅड, ट्रॉली, अंडरगारमेंट्स आणि प्रवाशांच्या अंगावर सोने लपवून ठेवलेले आढळले. दोन प्रवाशांना अटक करण्यात आली.

दुबईहून प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींना रोखण्यात आले आणि प्रवाशाने घातलेल्या सॅनिटरी पॅडमध्ये आणि 2000 ग्रॅम वजनाच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवलेली 24 कॅरेट सोन्याची धूळ जप्त करण्यात आली. दोन प्रवाशांना अटक करण्यात आली.

बंगळुरू शहरातील ओटेरासह तीन नामांकित हॉटेलांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

बंगळुरू शहरातील ओटेरासह तीन नामांकित हॉटेलांना बॉम्बने उडवून देणारा धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. दरम्यान बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक सध्या द ओटेरा हॉटेलमध्ये आहेत, पोलीस उपायुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे.

sakal Hindu samaj: घाटकोपर येथे सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, नितेश राणे आक्रमक

घाटकोपर येथे सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला आहे. घाटकोपर पश्चिमेकडील पारसीवाडी येथील ही घटना आहे.

आमदार नितेश राणे आज सायंकाळी ७ वाजता पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. नितेश राणे आज रात्री ८ वाजता चिरागनगर पोलिस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांशी बातचीतही करणार. त्यामुळे घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

CNG gas leak: सीएनजी गॅस गळतीमुळे कराड मलकापूर मार्गावर वाहतूक खोळंबली

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर जवळ सीएनजी गॅस घेऊन गेल जाणाऱ्या टेम्पोतील सीएनजी गॅस लिकेज झाला. सिलेंडर मधील गॅस बाहेर पडत होता. त्याची माहिती मिळतात पोलीस व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.

Palghar News: मोखाड्यात भीषण पाणी टंचाई

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी भिषण पाणी टंचाई निर्माण होते. ऊन्हाच्या तिव्रतेने यावर्षी पाणी टंचाई ने ऊच्चांकी आकडा गाठला आहे. अर्ध्याहून अधिक मोखाडा तालुका पाणी टंचाईने ग्रासला आहे. शासनाने तालुक्यात 83 टंचाई ग्रस्त गावपाड्यांना 26 टॅंकर द्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

Ujjani River: उजनी धरणात पडलेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले

उजनी धरणात पडलेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले आहेत.

प्रवरा नदित बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटली

प्रवरा नदित बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटली. यावेळी चार जणांसह एक स्थानिक बोटीत बुडाला असल्याची माहीती समोर येत आहे.

मुंबईतील होर्डिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार

मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील होर्डिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात समितीची स्थापन करण्यात आली आहे.

Loksabha 2024: सहाव्या टप्प्याच्या मतदानाचा प्रचार आज थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सातही जागांवर निवडणुका होत आहे. आज भाजप, काँग्रेस, आप या सर्वच पक्षांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे.

Prajwal Revanna : प्रज्वल रेवन्ना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून JD(S) खासदार प्रज्वल रेवन्ना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केली आहे.

Election Commission: निवडणूक आयोग करणार उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची चौकशी

अशिष शेलार यांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोग उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मतदानादिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चौकशी करणार आहे.

Indian Students In Kyrgyzstan: किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या 50 विद्यार्थ्यांना परत आणावे

किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या 50 विद्यार्थ्यांना परत आणावे अशी मागणी पालकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे भारत आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.

Pune Rain: राजगड परिसरात मुसळधार पाऊस

वेल्हे तालुक्यातील राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला असून, अनेकांना याचा फटका बसला आहे. यामध्ये शेतीसह घरांचे नुकसान झाले आहे.

Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गंगा आणि यमुना काठावर भाविकांची गर्दी

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर पवित्र स्नान आणि प्रार्थनेसाठी भाविकांनी गर्दी केली आहे..

Pune Porsche Accident: पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी

Latest Marathi News Live Update : सध्या राज्यासह देशभरात पुण्यातील कल्याणीनगर मध्ये अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघाताची चर्चा आहे. नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलीस प्रशासनालाही गंभीर पाऊले उचलावी लागली आहेत.

देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. 25 मे रोजी सहाव्या टप्प्यातील जागांवर मतदान होणार आहे. त्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

नैर्ऋत्य मोसमी पाऊस यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com