Punjab: लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील लाखा सिधानाला मिळाले तिकीट

लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी लखा सिधाना यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
Lakha Sidhana
Lakha Sidhanaesakal

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Elections 2022) शेतकरी संघटना संयुक्त समाज मोर्चाने 35 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. संयुक्त समाज मोर्चात शेतकऱ्यांच्या 22 संघटना एकत्र आल्या आहेत. आतापर्यंत उमेदवारांच्या चार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये माजी गँगस्टर लखविंदर सिंह उर्फ ​​लखा सिधानाचे (Lakha Sidhana)नाव आहे. संयुक्त समाज मोर्चाने मोर मंडईतून लाखा यांना तिकीट दिले आहे.

2012 मध्ये लक्खा यांनी मनप्रीत बादल यांच्या पीपल्स पार्टी ऑफ पंजाब (PPP) च्या तिकिटावर रामपुरा फूलमधून निवडणूक लढवली होती. तेव्हा लाखाला 10065 मते मिळाली. तो तिसऱ्या क्रमांकावर होता. 2013 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचारात लक्खा जखमी झाला होता. यादरम्यान एका पीपीपी कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला. 2019 मध्ये बादल गावात निषेध केल्याबद्दल लाखासह 60 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर मार्च दरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी लाखा सिधाना यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. लाखावर हिंसाचार भडकावल्याचा आरोप आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारी प्रमुख संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने त्यावेळी लाखाला दूर केले होते. यानंतर लाखा फरार झाला होता. त्यानंतर तो फेब्रुवारी २०२१ मध्ये भटिंडाच्या रामपूर फूल विधानसभेच्या अंतर्गत मेहराज गावात तरुणांच्या रॅलीला संबोधित दिसला. यानंतर लाखा अनेक कार्यक्रमांमध्ये दिसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com