
Punjab Chief Minister Bhagwant Mann admitted to Fortis Hospital in Mohali after sudden health issues.
Punjab CM Bhagwant Mann Hospitalized in Mohali: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री मान यांना पोटात त्रास जाणवत होता आणि त्यांना दोन दिवसांपासून तापही होता. आतापर्यंत ते घरी विश्रांती घेत होते पण त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता.
यावेळी जवळजवळ संपूर्ण पंजाब पुरामुळे त्रस्त आहे. यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान देखील सतत पूरग्रस्त भागांना भेट देत होते. परंतु दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्यामुळे ते त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत होते.
दरम्यान Punjab CM Bhagwant Mann Hospitalized in Mohali आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. यानंतर, केजरीवालांनी कपूरथला जिल्ह्यातील पूरग्रस्त भाग सुलतानपूर लोधीला भेट देऊन राज्यात सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी बाधित लोकांशीही संवाद साधला.
पंजाब सध्या दशकातील सर्वात मोठ्या पूर आपत्तीचा सामना करत आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सतलज, बियास आणि रावी नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
तर पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे, ज्यामुळे बाधित लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत पुरामुळे ४० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि साडेतीन लाखांहून अधिक लोकांचे नुकसान झाले आहे. तर सुमारे पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.