Punjab Election 2022 : माजी उपमुख्यमंत्री बादल यांचे मुख्यमंत्री चन्नी यांना आव्हान

या सरकारने मजिठियावर दाखल झालेल्या खोट्या आणि राजकीय खटल्यात कोणतेही पुरावे दाखवले तर मी राजकारण सोडेन
Sukhbir Singh Badal and Charanjit Singh Channi
Sukhbir Singh Badal and Charanjit Singh ChanniSukhbir Singh Badal and Charanjit Singh Channi

पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आता तोंडावर आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील शब्दयुद्ध शिगेला पोहोचले आहे. आता शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनी मंगळवारी विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना आव्हान दिले आहे. सुखबीर सिंग बादल यांनी तर चन्नी यांनी मजिठिया (Bikram Singh Majithia) यांच्याविरोधात पुरावे दाखवले तर राजकारणातून संन्यास घेईन, असे सांगितले.

अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांना ड्रग्ज प्रकरणी आरोपी बनवण्यात आले आहे. सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनी मजिठियाविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी NPS प्रकरणात मजिठियाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी न्यायालयाने मजिठिया (Bikram Singh Majithia) यांना अटकेतून तीन दिवसांचा दिलासा दिला.

Sukhbir Singh Badal and Charanjit Singh Channi
पुलाखाली रक्त अन् मांसाचा सडा; वाहनाचे मीटर १६० वर लॉक

राजकारण सोडण्याची घोषणा

सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मी जाहीर करतो की, या सरकारने मजिठियावर दाखल झालेल्या खोट्या आणि राजकीय खटल्यात कोणतेही पुरावे दाखवले तर मी राजकारण सोडेन. निष्पाप व्यक्तीला या खोट्या प्रकरणात अडकवायचे असेल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. आम्ही त्या सर्व अकाली कार्यकर्त्यांसाठी लढू ज्यांच्या विरोधात सध्याचे चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) सरकार सूडाच्या राजकारणाखाली गुन्हा दाखल करीत आहे. राज्यातील पुढील अकाली-बसपा सरकार एक न्यायिक आयोग स्थापन करेल, जो या खोट्या प्रकरणांची चौकशी करेल आणि त्यामागे असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

२०१८ मध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणी एसटीएफ अहवालाच्या आधारे मजिठियाविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिक्रम सिंह मजिठिया (Bikram Singh Majithia) हे माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचे भाऊ आणि सुखबीर सिंग बादल यांचे नातेवाईक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com