Sukhbir Singh Badal Firing: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादलांवर गोळीबार! सुवर्ण मंदिराबाहेर केला हल्ला...थरार कॅमेरात कैद!

Sukhbir Singh Badal Attacked: अमृतसर पोलीस आरोपीच्या पार्श्वभूमीची चौकशी करत आहेत. सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला का झाला, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ल्यामुळे सुवर्ण मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
Sukhbir Singh Badal Attacked
Sukhbir Singh Badal Sakal
Updated on

अमृतसर: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने सुखबीर बादल सुरक्षित आहेत. हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून पोलिसांनी आरोपीकडून पिस्तूल हस्तगत केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com