bhagwant singh maan and arvind kejriwal
sakal
पंजाब सरकारने राज्यातील १० लाख नवीन लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासाठी ‘स्मार्ट रेशन कार्ड योजने’चा शुभारंभ केला आहे. मुख्यमंत्री भगवंत सिंह मान आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत गुरुवारी (२६ नोव्हेंबर) मोगा येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्मार्ट रेशन कार्डांसह ‘मेरी रसोई’ या विशेष रेशन किटचे वितरण करण्यात आले.