पतीची हत्या केल्यानंतरही पत्नीला मिळेल पेन्शन; हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 2 February 2021

पंजाब हरियाणा हायकोर्टाने (Punjab and Haryana High Court) फॅमिली पेन्शनप्रकरणी (Family Pension) ऐतिहासिक निर्णय दिला आहे

नवी दिल्ली- पंजाब हरियाणा हायकोर्टाने (Punjab and Haryana High Court) फॅमिली पेन्शनप्रकरणी (Family Pension) ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटलंय की, पतीची हत्या करणाऱ्या महिलेचाही फॅमिली पेन्शनवर हक्क आहे. बलजीत कौरने 2008 मध्ये आपले पती तरसेम सिंह याची हत्या केली होती. पोलिसांनी 2009 मध्ये अंबालाची रहिवाशी असणाऱ्या बलजीतविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. 

Budget 2021: तुमच्या खिशावर थेट परिणाम करणाऱ्या 10 महत्त्वाच्या घोषणा

कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलंय की, एखादी महिला आपल्या पतीची हत्या करते, तरीही तिला मिळणारी पेन्शन थांबवली जाऊ शकत नाही. सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयाला फॅमिली पेन्शनच्या रुपात आर्थिक मदत केली जाते. मात्र, बलजीत कौरने आपल्या पतीची हत्या केल्यामुळे तिला फॅमिली पेन्शन दिली जाऊ शकत नाही, अशी भूमिका हरियाणा सरकारकडून घेण्यात आली होती. 

2011 मध्ये पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर बलजीत कौरची पेन्शन थांबवण्यात आली होती. त्यानंतर बलजीत कौरने हरियाणा सरकारच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. कोर्टाने आपल्या निर्णयात हरियाणा सरकारला आदेश दिलाय की त्यांनी दोन महिन्याच्या आता बलजीत कौरची सर्व शिल्लक पेन्शन द्यावी. कोर्टाचा हा निर्णय ऐतिहासिक मानलो जातोय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjab Haryana High Court Family Pension wife murder husband