मुख्यमंत्री म्हणतात, 'बस झालं आता; लॉकडाऊनचे नवे नियम जाहीर'

टीम ई सकाळ
Friday, 21 August 2020

पंजाब सरकारने (Punjab government) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे नवे नियम जाहीर केले असून काही काळासाठी कर्फ्यू (Punjab Curfew update) लावल्याची घोषणा करण्यात आली आहे.

चंदीगड : देशात काही केल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता दिसत नाही. अशात पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होताना दिसून येत आहे. अशामध्ये पंजाब सरकारने (Punjab government) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे नवे नियम जाहीर केले असून काही काळासाठी कर्फ्यू (Punjab Curfew update) लावल्याची घोषणा करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाबचे मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह (Amrinder singh) यांनी काही नव्या नियमांची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व शहरांध्ये शुक्रवार म्हणजे आज (ता. २१) रात्रीपासून कर्फ्यू (Punjab Curfew) असेल. सायंकाळी ७ वाजल्यापासून सकाळी ५ वाजेपर्यंत हा कर्फ्यू लागू राहील. तसेच, आठवड्याच्या शेवटी पंजाबमध्ये (Punjab Lockdown) राहणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

हे नवीन नियम ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. नवीन आदेशानुसार, सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर निर्बंध कायम राहणार आहेत. त्याचबरोबर सार्वजिनिक कार्यक्रमांवरही बंदी राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यामध्ये लग्न समारोह आणि अंतिम संस्कार यांना मुभा दिली असली तरी त्यांनी आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

काल (ता. २०) गुरुवारी रात्री या निर्णयाची मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी घोषणा केली आहे. त्यावेळी ते म्हणाले, कोरोनासोबतची लढाई आता युद्धस्तरावर करायला हवी. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनासोबतची लढाई आता सर्वांनी समोर येऊन लढायला हवी. राज्यात आतापर्यंत एकूण ९२० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हे त्रासदायक आहे. येणाऱ्या काळातील कोरोनाच्या आकड्यांचे अंदाज हे गंभीर असल्याने आपण पूर्वतयारी करायला हवी, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंजबामध्ये आतापर्यंत ३६ हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून ९०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण १२०० अॅक्टिव्ह रुग्ण असून बुधवारी राज्यात २४ तासात १६९३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती, तर एकूण २४ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी कोरोना चाचण्याही वाढवण्याचा निर्णय घेतला असून २४ तासात किमान ३० हजार कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेशही दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punjab reimposes night curfew weekend lockdown till Aug 31