
पंजाबात तलवारी नाचवत झालेल्या गोंधळानंतर शिवसेना नेत्याला अटक
पंजाबमधल्या पटियाला भागात काल शिवसेना आणि शीख संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. तलवारींसह दगडानेही दोन गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. हा हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला होता. दरम्यान या प्रकरणी शिवसेना नेते हरिश सिंगला यांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पंजाबमधले कार्यकारी प्रमुख हरिश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली काल खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काही खलिस्तान समर्थक या मोर्चाच्या ठिकाणी आले. श्री काली देवी मंदिरासमोर हे दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झालं होतं. मोर्चाच्या विरोधात काही शीख युवकांनी शिवसैनिकांना माकड सेना असंही संबोधत मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
यानंतर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली, तसंच काहींनी तलवारीने हल्लाही केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. या सगळ्या घटनेनंतर पटियाला इथं संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता आज या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पंजाबमधले कार्यकारी प्रमुख हरिश सिंगला यांना अटक करण्यात आली आहे. आता परिस्थिती शांत झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
Web Title: Punjab Violence Shivsena Leader Harish Singla Arrested In Patiala
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..