
Jagannath Rath Yatra 2022: जगन्नाथ यात्रेतील मूर्तीरूपी प्रतिमा आजही का 'अर्धवट'...जाणून घ्या कारण
चार धामा यात्रेसाठी लोकांच्या मनात विशेष श्रद्धा असते.पुरीच्या जगन्नाथ यात्रेला पुरूषोत्तम पुरी,शंख क्षेत्र, आणि श्रीक्षेत्र सारख्या नावाने ओळखल्या जाते.श्री जगन्नाथ देवाला श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो.अतिशय आनंद आणि उल्हासाने दरवर्षी श्री जगन्नाथांची रथ यात्रा काढली जाते.रथयात्रेचा शुभारंभ शुक्ल पक्षात केला जातो.यावर्षी ही रथयात्रा १ जुलैला सुरू होणार असून त्याचा समारोप १२ जुलैला होणार आहे.(Jagannath Rath Yatra News)
१५ लाख भक्त सहभागी होण्याचा अंदाज
यात्रेच्या दिवसात जवळपास १५ श्रद्धाळू लोकांच्या सहभागाची शक्यता आहे.हे श्रद्धाळू जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या सजवलेल्या रथाला मोठ्या मोठ्या दोरांनी ओढत जगन्नाथांच्या मावशीच्या घरी गुंडीचा मंदिर येथे घेऊन जातात.(God)हे मंदिर जगन्नाथ मंदिरापासून तीन किलोमीटर दूर आहे.या भक्कम रथांना ओढण्यात भक्त त्यांची धन्यता मानतात.या रथांची सजावट पंचतत्वाने केली जाते.लाकूड,धातू,रंग,वस्त्र आणि सजावटीचा यात समावेश असतो.औषधोपयोगी कडूनिंबाच्या झाडाच्या लाकडाचा रथ निर्मितीसाठी उपयोग केला जातो.

या रथयात्रेत 'तालध्वज' म्हटलं जाणारं बलरामांचं हिरव्या रंगाचं रथ सर्वात पुढे असतं.मधात सुभद्राचं 'दर्पदलन' नावाचं रथ असतं.आणि श्री जगन्नाथांच 'गरूडध्वज' सर्वात शेवटी असते.जगन्नाथांचा रथ लाल पिवळ्या रंगाचा आहे.१६ चाकाचा जगन्नाथांचा रथ ४५.६ फूट उंच असतो तर बलरामांच्या रथाची उंची ४५ फूट आणि सुभद्राच्या रथाची उंची ४४.६ फूट उंचीचं असते. या रथाला बनवण्यासाठी कुठल्याही धारदार वस्तूचा उपयोग केला जात नाही.

रथाच्या तिन्ही मूर्त्या का आहेत अर्धवट जाणून घ्या
जगन्नाथ,बलराम आणि सुभद्रेच्या मूर्तीचे निर्माण कार्य विश्वकर्मा यांना सोपवण्यात आले होते.यावेळी त्यावेळच्या राजाला विश्वकर्मा यांनी मूर्तीची निर्मिती होत पर्यंत राजाला कक्षात प्रवेश करायला मनाई केली होती.मात्र राजाने त्याची अवहेलना करत कक्षात प्रवेश केला.त्यानंतर विश्वकर्माने मूर्तीचे काम अर्धवटच सोडून दिले.त्याच कारणाने आजही या तिन्ही मूर्त्या अर्धवट आहेत.
Web Title: Puri Jagannath Rath Yatra Do You Know Why Jagannath Idols Are Incomplete
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..