
पुरी : ओडिशातील पुरी येथे आज लक्षावधी भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली. भगवान श्री जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ‘जय जगन्नाथ’ आणि ‘हरि बोला’ असा जयघोष, टाळ-मृदंगाचे वादन आणि शंखनाद अशा भक्तिमय वातावरणात भव्य अशा तीन रथांनी ‘बोडा डांडो’ (महामार्ग)वरून गुढीची मंदिराकडे आपली दिव्य यात्रा सुरू केली. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रभू जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे रथ ओढले.