
पूर्णिया, बिहार: बिहारमध्ये एक अत्यंत धक्कादायक हत्याकांड घडले आहे. पूर्णिया जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीगंज पंचायतच्या टेटगामा, वार्ड क्रमांक १० येथे एका महिलेवर जादूटोण्याचा संशय घेऊन तिला आणि तिच्या कुटुंबातील आणखी चार जणांना जिवंत जाळण्यात आलं. हे पाचही जण रविवार रात्रीपासून रहस्यमय पद्धतीने बेपत्ता होते. बाबू लाल उरांव, त्यांची पत्नी आणि कुटुंबातील इतर तीन सदस्यांना जिवंत जाळण्यात आल्याचे समोर आले आहे.