Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami inaugurates the upgraded primary school where he began his education.
esakal
उत्तराखंड: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ज्या प्राथमिक शाळेतून शिक्षणाची सुरुवात केली, त्या उधम सिंह नगर जिल्ह्यातील नगला तराई प्राथमिक विद्यालयाचे आता आधुनिक मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून शाळेत पाच वर्गखोल्या, आधुनिक वर्ग आणि अन्य सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री धामी यांनी या शाळेचे लोकार्पण करून ती विद्यार्थ्यांना समर्पित केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.