नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक 2024 च्या आधी भाजप प्रत्येक वर्गातील मतदारांना आकर्षित करण्यात व्यस्त आहे. त्यासाठी भाजपकडून अनेक प्रकारच्या परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. अल्पसंख्याक विरोधी असा ठप्पा असलेल्या भाजपने मुस्लीम समाजाला आकर्षित करण्यासाठी त्यांना संघटनेसह सरकारमध्ये महत्त्व देण्याचं ठरवलं आहे.
यूपीच्या योगी सरकारने 'सूफी संवाद महा अभियाना'च्या माध्यमातून मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी नवा प्लॅन तयार केला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. त्याअंतर्गत भाजपचे मुस्लीम नेते दर्ग्यात जाऊन कव्वाली ऐकणार आहेत. कव्वालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा प्रचार केला जाणार आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे देशभरात सुफी संवाद महाअभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत भाजप सरकारच्या सर्व योजनांचा लाभ भेदभाव न करता मुस्लिमांना दिला जात असल्याचे स्पष्ट करण्यात येणार आहे.
यूपीच्या महापालिका निवडणुकीनंतर यूपीतील प्रत्येक शहरातील मुख्य दर्ग्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यूपीच्या अल्पसंख्याक आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून सुफी दर्गा आणि त्यांच्या खादिमांची यादी मागविण्यात आली आहे. प्रचारादरम्यान भाजपचे अनेक राज्य आणि केंद्रीय मंत्री या कव्वालीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.