High Court : मुलांनी स्वःचा जोडीदार निवडणं विश्वासघात नव्हे, घटनादत्त आधिकार - हायकोर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Couple

High Court : मुलांनी स्वःचा जोडीदार निवडणं विश्वासघात नव्हे, घटनादत्त आधिकार - हायकोर्ट

नवी दिल्ली : कुटुंबियांचा कथीत विश्वासघाताचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत मुलांच्या स्वतःचा जोडीदार निवडण्याच्या अधिकारावर गदा येऊ शकत नाही. कारण जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य राज्य घटनेतील कलम २१ चा अंतर्गत भाग आहे, असं दिल्ली हायकोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळं ज्या जोपडप्यांनी स्वतःच्या मर्जीनं जोडीदार निवडून लग्न केलं आहे आणि त्यांना आपल्या कुटुंबासह इतरांकडून धोका असल्याची चिंता असेल तर अशा जोडप्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आवश्यक उपाय करायला हवेत, अशा शब्दांत न्या. अनुप कुमार मेंदीरत्ता यांनी पोलिसांना निर्देश दिले. (Questions pf faith have no bearing on Individual freedom to choose a Life Partner says Delhi HC)

हेही वाचा: Bank job : एसबीआयमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; दीड हजार जागांवर भरती

कायद्यानुसार लग्नासाठी आपल्या आवडीचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१ चा भाग आहे. त्यामुळं विश्वासाचे प्रश्न देखील कोणत्याही व्यक्तीच्या जोडीदार निवडीच्या स्वतंत्रतेवर कोणताही परिणाम होत नाही, असं हायकोर्टानं म्हटलं आहे.

हेही वाचा: Biryani : बिर्याणीतील मसाल्यामुळे पुरूषत्व कमी होते; TMC नेत्याचा अजब दावा

कोर्टानं आपल्या आदेशात तीन जामिनाच्या याचिकांवर टिप्पणी केली. ही याचिका एका महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी दाखल केली होती. या महिलेनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कुटुंबियांच्या इच्छेशिवाय लग्न केलं होतं. यामध्ये महिलेच्या पतीनं आपल्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या आरोपांवरुन एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

नक्की काय घडलंय?

पतीच्या आरोपांनुसार त्याच्या पत्नीच्या कुटुंबियांनी त्या दोघांचं अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण केली. तसेच पतीच्या प्रायव्हेट पार्टवर कुऱ्हाडीनं वार केले. यामध्ये त्यानं असाही आरोप केला की, आपल्यावर चाकूने वार करण्यात आले तसेच त्यानंतर व्यक्तीला एका नाल्यात फेकून देण्यात आलं. तिथून त्याच्या भावानं त्याला वाचवलं आणि एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. मुलीच्या कुटुंबियांच्या इच्छेविरोधात लग्न केल्यानं ते चिडलेले होते. त्यानंतर त्यांनी जीवेमारण्याची धमकी दिली. त्यानंतर पतीनं दिल्ली पोलिसांमध्ये २२ डिसेंबर २०२१ रोजी राजौरी गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार दिल्यानंतर घरी परतताना त्यांचं मुलीच्या कुटुंबियांकडून अपहरण करण्यात आलं आणि मारहाण करण्यात आली.