राबडी देवींनी PM मोदींबाबत व्यक्त केला ‘हा’ विश्वास; म्हणाल्या...

Rabri Devi demands release of youths arrested in Agneepath agitation
Rabri Devi demands release of youths arrested in Agneepath agitationRabri Devi demands release of youths arrested in Agneepath agitation
Updated on

पाटणा : बिहारमध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात (Agneepath agitation) झालेल्या हिंसक निदर्शनांचा मुद्दा विधानसभेतही जोरात गाजत आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनीही आरजेडीच्या नेत्यांसोबत पाटणा येथे फलक घेऊन अग्निवीर सैन्याच्या पुनर्स्थापनेवर निषेध व्यक्त केला. आंदोलनात अटक (arrested) केलेल्यांची सुटका करा. केंद्र सरकारने ही योजना मागे घ्यावी, असे राबडी देवी (Rabri Devi) म्हणाल्या. (Rabri Devi demands release of youths arrested in Agneepath agitation)

अग्निपथ योजना देशासाठी चुकीची आहे. आम्हाला माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी ते परत घेणार नाहीत, असेही माजी मुख्यमंत्री राबडी देवी म्हणाल्या. ‘अग्निपथ योजना तरुणांना नको, भाजप सरकारला देश पेटवायचा आहे’ असे राबडी देवींनी घेतलेल्या फलकावर लिहिले होते.

Rabri Devi demands release of youths arrested in Agneepath agitation
महिला म्हणताहेत, गर्भपाताचा अधिकार मिळाल्यानंतरच संबंध बनवणार

नरेंद्र मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेच्या (Agneepath agitation) घोषणेनंतर अग्निवीर सैन्याच्या पुनर्स्थापनेच्या निषेधार्थ देशातील अनेक राज्यांमध्ये युवकांनी निदर्शने केली. त्याचा सर्वाधिक परिणाम बिहारमध्ये दिसून आला. बिहारमध्ये तरुणांनी रागाच्या भरात अनेक गाड्या पेटवल्या. सगळीकडे आग लागली होती. अनेक जिल्ह्यांतील भाजपची कार्यालयेही जाळण्यात आली. या हिंसाचारानंतर पोलिसांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात तरुणांना अटक केली आहे.

योजनेला वाढत असलेला विरोध पाहता केंद्र सरकारने योजनेत अनेक बदल केले. अनेक लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाद काही शांत झाला नाही. सरकारकडून योजनेचे अनेक फायदे समजावून सांगण्यात आले. तरी होणारा विरोध अद्याप शांत झालेला नाही. अशात राबडी देवी (Rabri Devi) यांनी अटक (arrested) केलेल्या आंदोलकांना सोडण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com