हैदराबाद : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी एका ज्येष्ठ लेखकाला अटक

Minor girl sexually abuse
Minor girl sexually abuse sakal media
Updated on

हैदराबाद : राजस्थानमधील अलवार जिल्ह्यात अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार (rajasthan rape crime) झाल्याची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्येही (hyderabad) अल्पवयीनवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडलीय. या प्रकरणातील आरोपी हा कायदेविषयक पुस्तकांचा प्रकाशक आणि लेखक आहे. गधे विरा रेड्डी (७२) असं या आरोपीचं नाव असून रचाकोंडा पोलिसांनी (Rachakonda police) ११ जानेवारीला रेड्डीला अटक केलीय. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Rachakonda police arrested law books writer gadhe veera reddy in minor girl sexually abusing case)

Minor girl sexually abuse
दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार, गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार

रचाकोंडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी रेड्डी सप्टेंबर २०२१ मध्ये पीडितेच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. डिसेंबरमध्ये पीडितेची आई तिच्या भावाकडे गावी गेली होती. त्यावेळीही आरोपी रेड्डीने पीडित मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर पीडित मुलीने घडलेल्या घटनेबद्दल तिच्या आईला सांगितलं आणि मिरपेट पोलिसांकडे तक्रारे केली.

आरोपीने त्याच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबियांना धमकावलं. जर तक्रार मागे घेतली नाही तर मी आत्महत्या करेन अशीही धमकी आरोपीनं पीडितीच्या कुटुंबियांना दिली होती. या प्रकरणी आरोपी रेड्डीवर पोलिसांनी कारवाई केली असून आयपीसीच्या सेक्शन २०१,३४२,५०६, ३७६ (३), पोक्सो कायद्यांतर्गत सेक्शन ३ व ४, सेक्शन 3 (I) (w) & सेक्शन 3 (2) (V) of SC/ST (POA) Act-1989,(२०१५ च्या कायद्यातील तरतुदीनुसार) मीरपेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com