गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 'हा' युवा नेता असणार 'आप'चा चेहरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

punjab politics aap said bjp is plotting to topple punjab government

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 'हा' युवा नेता असणार 'आप'चा चेहरा

नवी दिल्ली : Gujrat Vidhansabha Election 2022 : आम आदमी पक्ष (AAP) या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण ताकदीनिशी गुजरातमध्ये उतरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रचाराचे नेतृत्व करण्यासाठी पक्ष एका युवा नेत्याला पुढं करण्याच्या विचार करत आहे.

आम आदमी पक्ष गुजरातमधील प्रचाराची जबाबदारी खासदार राघव चढ्ढा यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या विजयात चढ्ढा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राघव चढ्ढा यांनी दिल्ली आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. पक्षातील तरुण पिढी त्यांच्याकडे लोकप्रिय चेहरा म्हणून पाहते.

दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आदमी पक्षासाठी गुजरात हे पुढील मोठे लक्ष्य आहे, जेथे या वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. AAP चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच गुजरात राज्यात अनेक दौरे केले आहेत. सर्वांना नोकऱ्या, मोफत वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण तसेच शिक्षण क्षेत्रातील सुधारणांचे आश्वासन देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकंच नाही तर आम आदमी पक्षानं गावप्रमुखांसाठी पगारही निश्चित केला आहे.

आम आदमी पक्ष गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी होऊ पाहात आहे. आतापर्यंत या जागेवर काँग्रेस पक्ष होता. राज्य युनिटच्या सदस्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, "असे लोक आहेत ज्यांना राज्यात भाजपची सत्ता नको आहे आणि त्यांना काँग्रेसला मत देणेही आवडत नाही. त्यांची मते आम्हाला मिळवायची आहेत कारण आम्ही राज्यात भाजपला पर्याय आहोत.