
नवी दिल्ली : बिहारमधील मतदारयादी फेरपडताळणीवरून सर्व विरोधक आक्रमक असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज कर्नाटकमधील मतदार यादीतील गोंधळाचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. आयोगाविरुद्ध १०० टक्के पुरावे असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आणि आयोगाचे अधिकारी यातून सहजासहजी बाहेर पडू शकणार नाही, असा इशाराही दिला.