J. P. Nadda : काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्येच शरणागती; भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा हल्लाबोल, सुधांशू त्रिवेदी यांचीही टीका
India Politics : राहुल गांधी यांनी भोपाळमध्ये पंतप्रधान मोदींवर पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी केल्याचा आरोप केला. त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शरणागती शब्दाच्या वापरावर तीव्र आक्षेप घेतले.
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच भोपाळ येथे केला होता.