esakal | जगाचा नव्हे देशाचा विचार करा! राहुल गांधींचा मोदींना प्रेमळ सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

 rahul gandhi, Modi Government, Congress

मोदी सरकारने जारी केलेल्या कोरोनासंदर्भातील विशेष पॅकेजमध्ये फेरबदल करण्याची गरज असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

जगाचा नव्हे देशाचा विचार करा! राहुल गांधींचा मोदींना प्रेमळ सल्ला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदर राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रेमळ सल्ला दिलाय. सध्याच्या घडीला सरकारसह विरोधी पक्षांनी देशाप्रती असणारी जबाबदारी पार पाडण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारने जारी केलेल्या कोरोनासंदर्भातील विशेष पॅकेजमध्ये फेरबदल करण्याची गरज असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. कोरोनाजन्य परिस्थितीत लॉकडाउनच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. टप्प्याटप्याने यासंदर्भातील घोषणाही केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून करण्यात येत आहे. 

कैद्यावर लक्ष ठेऊन असलेल्या पोलिसांचा मध्यरात्री लागला डोळा अन् दोन तासांनी उघडकीस आली ही घटना...

गरिबांच्या खात्यात थेट पैसे टाकण्यावर मोदी सरकारने विचार करायला हवा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, मोदीजींना मी प्रेमळ भाषेत सांगू इच्छूतो की, देशाच्या विकासात गरिब, मजूर आणि छोटे व्यापाऱ्यांचा मोठा वाटा आहे. सध्याच्या घडीला हा वर्ग अडचणींचा सामना करत आहे. त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी थेट त्यांच्या खिशात पैसे येतील, अशी तरतूद करणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले थेट खात्यात पैसे जमा केल्याने जागतिक स्तरावरील आपले रेटिंग कमी होईल, याचा मोदी सरकार विचार करत आहे. मात्र सध्याच्या घडीला मोदींनी जगाचा विचार करण्यापेक्षा देशाचा विचार करण्याची गरज आहे.  

लॉकडाउनचा तिरुपती देवस्थानलाही फटका; झालं एवढ्या रुपयांचं नुकसान  

कोरोना विषाणूचा सामना करत असताना देशव्यापी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 मे नंतर चौथ्या टप्प्यातही लॉकडाउन कायम राहणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. लॉकडाउनसंदर्भात राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाउन हा काही इव्हेंट नाही तर ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेताना विशेष काळजी घेऊन योग्य ती रणननितीनुसारच पुढेही निर्णय घ्यावा लागेल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.   

loading image