Rahul Gandhi : लेखी पाठविल्यावर उत्तर देऊ; राहुल यांच्या आरोपावर आयोगातील सूत्रांचे म्हणणे
Maharashtra Elections : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने फक्त लेखी तक्रार आल्यावरच अधिकृत स्पष्टीकरण देण्याची तयारी दर्शवली आहे.
नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी थेट निवडणूक आयोगाला लेखी पत्र पाठवतील तेव्हाच या घटनात्मक संस्थेकडून अधिकृत स्पष्टीकरण दिले जाईल, असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले.