
नवी दिल्ली : गुजरातमध्ये दहा अपरिचित पक्षांनी चार हजार ३०० कोटी रुपयांचा निवडणुकनिधी मिळवून केवळ ३९.०२ लाख रुपये खर्च केले असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला. तसेच, या अपरिचित पक्षांची चौकशी करणार की पुन्हा प्रतिज्ञापत्राची मागणी करणार, असा उपरोधिक सवाल करत त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिले.