Rahul Gandhi: बिहार निवडणूक घोटाळा? राहुल गांधींचा आरोप, गया जिल्ह्यात एका गावातील ९४७ मतदार ‘घर क्रमांक सहा’मध्ये दाखल
Bihar Election: काँग्रेस नेते राहुल गांधींनी बिहारच्या गया जिल्ह्यातील मतदार यादीत अनियमिततेचा आरोप केला. एका गावातील ९४७ मतदार सर्व एका घरात दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले की काल्पनिक घर क्रमांक दिले गेले आहेत.
पाटणा : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर नवा आरोप करताना असा दावा केला, की बिहारच्या मसुदा मतदारयाद्यांमध्ये गया जिल्ह्यातील संपूर्ण गावच एका घरात राहत असल्याचे दाखवले गेले आहे.