Rahul Gandhi: "Modani मॉडेल! पहिल्यांदा लुटा मग शिक्षेविना सुटा"; राहुल गांधींचा पुन्हा संताप

Latest Marathi News: मेहुल चोक्सीला इंटरपोलच्या वॉन्टेड लिस्टमधून वगळल्यानं PM मोदींवर साधला निशाणा.
Rahul Gandhi and Narendra Modi
Rahul Gandhi and Narendra Modi

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या मेहुच चोक्सी याला इंटरपोलच्या वॉन्टेड लिस्टमधून वगळण्यात आलं आहे. यावरुन आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

विरोधकांसाठी ED-CBI आणि मित्रांची मात्र मुक्तता अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi angry on govt over Mehul Choksi drop from Interpol wanted list says its Modani model)

चोक्सीला इंटरपोलच्या वॉन्टेड लिस्टमधून का वगळलं?

इंटरपोलनं २०२८मध्ये चोक्सी विरोधात 'रेड कॉर्नर' नोटिस जारी केली होती. भारतातून फरार झाल्यानंतर तब्बल १० महिन्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली होती. त्याचवर्षी चोक्सीनं अँटिग्वा तसेच बारबुडाचं नागरिकत्व स्विकारलं होतं.

Rahul Gandhi and Narendra Modi
Nitin Gadkari: नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! दोन फोन कॉल्समुळं खळबळ

चोक्सीनं आपल्याविरुद्धच्या या रेड कॉर्नर नोटीशीला आव्हान दिलं होतं आणि हे प्रकरण राजकीय षड्यंत्र असल्याचंही म्हटलं होतं. चोक्सीनं आपल्या याचिकेत भारतातील तुरुंगातील परिस्थिती, त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य यासारखे मुद्देही मांडले होते.

रिपोर्टनुसार, चोक्सीच्या याचिकेनंतर हे प्रकरण पाच सदस्यीय इंटरपोल समितीच्या कोर्टात गेलं. या समितीला कमिशन फॉर कंट्रोल फाइल्स म्हणतात. सुनावणीनंतर या समितीनं रेड कॉर्नर नोटीस रद्द केली.

हेही वाचा - झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

राहुल गांधींनी ट्विटमधून काय म्हटलं?

मेहुल चोक्सीला वॉन्टेड लिस्टमधून वगळल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

"विरोधकांना ईडी, सीबीआय आणि मित्रांची मात्र सुटका! मोडानी मॉडेल म्हणजे आधी लुटा आणि नंतर शिक्षेविना सुटा!" अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा कथितरित्या उल्लेख करत निशाणा साधला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com