

नवी दिल्ली : पीडित आणि श्रमिक लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ‘व्हाइट टी शर्ट’ मोहिमेची सुरुवात केली जात असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन गांधी यांनी केले आहे.