Rahul Gandhi Disqualified : 'मोदीं'विरोधात राहुल गांधीनी थोपटले दंड! 'त्या' निर्णयाला देणार आव्हान

Rahul Gandhi News
Rahul Gandhi Newssakal

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव मानहाणी प्रकरणात सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सुरत कोर्टाच्या या निकालाला राहुल गांधी उद्या सेशन कोर्टात आव्हान देणार आहेत. या शिक्षेला न्यायालयात आव्हान देण्यासाठी राहुल गांधी यांना एक महिन्याची मुदतही देण्यात आली आहे. दरम्यान उद्या सुरतला जाऊन राहुल गांधी हा याचिका दाखल करू शकतात.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उद्या सेशन कोर्टात अशी याचिका दाखल करू शकतात. तसेच राहुल गांधी यांच्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई देखील रद्द होण्याचीही शक्यता आहे.

राहुल गांधी यांच्यावर २०१९ साली मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरत कोर्टाने २३ मार्च २०२३ रोजी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनंतर राहुल गांधी यांची लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यानंतर काँग्रेसकडून भाजप विरोधात आंदोलने केली जात आहेत.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

मग काय होईल..

सुरत कोर्टाच्या निकालाला राहुल गांधी उद्या सेशन कोर्टात आव्हान देणार अशी चर्चा आहे. राहुल गांधी हे अखेर त्यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात आव्हान याचिका दाखल करणार आहेत. दरम्यान कोर्टाने दिलेल्या या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास त्यांच्यावर झालेली अपात्रतेची कारवाई देखील रद्द होण्याचीही शक्यता आहे. उद्या सेशन कोर्ट याबाबत काय निर्णय घेतं याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi News
Salim Durani Death : युवराज अन् धोनीच्या आधीचा 'सिक्सर किंग'; ऑन डिमांड मारायचा षटकार

राजकारण तापलं..

भाजपने काँग्रेसवर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या लिगल टीमने या प्रकरणी सुरत कोर्टात निकालाविरोधात याचिका दाखल करण्यास उशीर केल्यावरून निशाणा साधला आहे. काँग्रेस आगामी कर्नाटक निवडणुकामध्ये याचा राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे भाजपने म्हटले आहे.

यावर काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की कायदेशीर बाजू सांभाळणारी टीम यावर काम करत आहेत. तसेच ते म्हणाले की केव्हा कुठे अपील करायची ते आम्हाला ठावूक आहे, आमच्याकडे ३० दिवसांचा वेळ आहे.

Rahul Gandhi News
Mumbai News : बांधकाम सुरू असताना खाली पडलेला सळई तरूणाच्या शरीरातून आरपार; मग पुढे…

नेमकं काय झालं होतं?

राहुल गांधी यांनी २०१९ लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान कर्नाटकमधील कोलार येथे 'सारे चोरों के नाम मोदी कैसे हैं' असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्यावर केस करण्यात आली. त्यांच्यावर संपूर्ण मोदी समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला. यानंतर त्यांना कोर्टाने या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com