प्रिय राज्यपाल, मी काश्मिरमध्ये येतो पण... : राहुल गांधी

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

जम्मू-काश्मिरमधून कलम 370 हटविल्यानंतर राहुल गांधी यांनी काश्मिरमधील परिस्थितीविषयी वक्तव्य केले होते. त्याला उत्तर म्हणून जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना काश्मिरमध्ये कशी शांतता आहे हे पाहण्यासाठी विशेष विमान पाठवू असे म्हटले होते. 

नवी दिल्ली : काश्मिरमध्ये तुम्हा बोलावले आहे, याचे स्वागत करतो. पण, तुम्ही आम्हाला मुक्तपणे फिरण्याची, नागरिकांना भेटण्याची आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का, असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मिरच्या राज्यपालांना केला आहे.

जम्मू-काश्मिरमधून कलम 370 हटविल्यानंतर राहुल गांधी यांनी काश्मिरमधील परिस्थितीविषयी वक्तव्य केले होते. त्याला उत्तर म्हणून जम्मू-काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना काश्मिरमध्ये कशी शांतता आहे हे पाहण्यासाठी विशेष विमान पाठवू असे म्हटले होते. 

याविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले, की जम्मू काश्मिरच्या प्रिय राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावरून मी आणि विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ काश्मीर आणि लडाखमध्ये येण्यास तयार आहे. त्यासाठी आम्हाला विमानाची गरज नाही. पण, तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यपणे फिरण्याचा, लोकांना भेटण्याचा आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi ask some questions to Jammu and Kashmir governor