esakal | भागवतांचा फोटो कुणा महिलेसोबत दिसलाय का? राहुल गांधींची RSSवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

भागवतांचा फोटो कुणा महिलेसोबत दिसलाय का?- राहुल गांधी

भागवतांचा फोटो कुणा महिलेसोबत दिसलाय का?- राहुल गांधी

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने आक्रमकपणे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना दिसून येतात. आज देखील राहुल गांधींनी RSS वर मोठी जहरी टीका केली आहे. आज ते दिल्लीमध्ये ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनी नव्या लोगोचं अनावरण करताना बोलत होते. त्यांनी या भाषणात RSS आणि काँग्रेसमध्ये काय फरक आहे, तो उलगडून दाखवला आहे. तसेच RSS वर कोरडे आसूड ओढले आहेत.

हेही वाचा: "गोडसे-सावरकरांच्या RSS विचारधारेशी समझौता कधीच शक्य नाही"

यावेळी ते म्हणाले की, तुम्ही जेंव्हा महात्मा गांधींचा फोटो पाहता, तेंव्हा तुम्हाला त्यांच्याभोवती 2-3 महिला दिसतील. तुम्हाला कधी मोहन भागवतांचा फोटो कुणा महिलेसोबत दिसलाय का? याचं कारण असं आहे की, त्यांची संघटना महिलांना दडपून टाकते आणि आमची संघटना महिलांना उचित स्थान देते. मोदी-RSS ने कधीच महिलांना पंतप्रधान केलं नाही. मात्र काँग्रेसनं केलंय.

पुढे राहुल गांधी यांनी म्हटलंय की, काँग्रेसची विचारधारा ही भाजप आणि RSS च्या विचारधारेहून भिन्न आहे. एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी बाकी विचारधारांसोबत काही ना काही समझौता करु शकतो; मात्र RSS आणि भाजपच्या विचारधारेसोबत मी कसल्याही प्रकारचा समझौता करु शकत नाही. आपल्यासाठी खरंच मोठा प्रश्न आहे की, महात्मा गांधींची काँग्रेस आणि गोडसे आणि सावरकरांच्या विचारधारेमध्ये काय फरक आहे.

हेही वाचा: टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या सुधारणांना मंजुरी; Vodafone-Ideaला दिलासा

भाजपवाले स्वत:ला हिंदू पक्ष म्हणवून घेतात आणि संपूर्ण देशामध्ये लक्ष्मी आणि दुर्गेवर आक्रमम करतात. हे लोक जिथे जातात तिथे काही ठिकाणी लक्ष्मीला मारतात तर काही ठिकाणी दुर्गेला मारतात. हे हिंदू धर्माचा वापर करतात, हे धर्माची दलाली करतात. मात्र, हे लोक हिंदू नाहीत.

गेल्या 100-200 वर्षांमध्ये जर कुणा व्यक्तीने हिंदू धर्माला जाणून घेतलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव महात्मा गांधी आहे. ही गोष्ट आपण आणि RSS-भाजपचे लोक देखील मान्य करतात. मात्र, जर महात्मा गांधींनी हिंदू धर्माला समजून घेत आपलं संपूर्ण आयुष्य हिंदू धर्मासाठी वाहून दिलं तर RSS च्या विचारधारेने त्या हिंदूच्या छातीमध्ये तीन गोळ्या का झाडल्या? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

loading image
go to top