
नवी दिल्ली : ‘‘केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्यापीठ, ‘आयआयटी’ सारख्या उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमातीच्या तसेच ओबीसी उमेदवारांना पात्र असूनही नॉट फाऊंड सुटेबल (योग्य उमेदवार न मिळणे) या श्रेणीचा वापर करून अपात्र ठरविले जात आहे, हा नवा मनुवाद आहे,’’ असा आरोप काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज केला.