पंतप्रधानांना समजत नाही कसा मार्ग काढायचा : राहुल गांधी 

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की आरबीआयकडून पैसे चोरण्यात काही अर्थ नाही. कारण, अर्थव्यवस्थेला झालेली जखम मोठी असून, एवढ्या निधी काहीही होणार नाही. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असून, त्यांना यातून मार्ग कसा काढायचा हे समजत नाही, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

रिझर्व्ह बॅंकेने केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटींचा निधी हस्तांतर करण्याच्या अहवाल मंजूर केला आहे. 'आरबीआय'कडील राखीव निधीचा विनियोग करण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या माजी गव्हर्नर डॉ. विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या शिफारसींनुसार "आरबीआय" ने सोमवारी सरकारला 1 लाख 76 हजार 51 कोटी हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला. कर महसूल आणि खर्चाचा ताळमेळ राखण्यात कसरत करणाऱ्या केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. 

यावरून काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की आरबीआयकडून पैसे चोरण्यात काही अर्थ नाही. कारण, अर्थव्यवस्थेला झालेली जखम मोठी असून, एवढ्या निधी काहीही होणार नाही. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली आहे.

तर, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी ट्विट करत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून हा निधी घेणे म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट असल्याचे यावरुन स्पष्ट होते, असे म्हटले आहे. सरकारकडून स्वत:ला प्रोत्साहन निधी देणे म्हणजेच अर्थव्यवस्था बिकट परस्थितीत असल्याचा हा पुरावा आहे. सरकार आपल्या स्वत:च्या एक युनिट म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi attacks on PM Narendra Modi for help to RBI