esakal | राहुल गांधी हे गोंधळलेले नेते 
sakal

बोलून बातमी शोधा

barak obama - a promised land

ओबामा यांनी लिहिले आहे की, राहुल हे एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे वाटतात. ज्याने अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि आपल्या शिक्षकांना प्रभावित करण्यासाठी उत्सुक आहे.

राहुल गांधी हे गोंधळलेले नेते 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘ए प्रॉमिस लँड’ या नव्या पुस्तकात काँग्रेसचे नेचे राहुल गांधी यांचे वर्णन गोंधळलेले नेते असा केला आहे. 

ओबामा यांनी लिहिले आहे की, राहुल हे एखाद्या घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे वाटतात. ज्याने अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि आपल्या शिक्षकांना प्रभावित करण्यासाठी उत्सुक आहे, पण फारशी चमक नसलेला आणि त्या नाही आणि त्या विषयातही प्रावीण्य मिळविण्याची गुणवत्ता विद्यार्थ्यात नाही, असे राहुल आहेत. ‘ए प्रॉमिस लँड’ या ओबामा यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या भागातील हा उल्लेख ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने प्रसिद्ध केलेल्या लेखात केला आहे. ओबामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अमेरिकेसह जगभरातील राजकीय नेत्यांवर भाष्य केले आहे. यात राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचाही समावेश आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल -ओबामा यांची भेट 
ओबामा यांच्या कार्यकाळात राहुल गांधी हे काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. डिसेंबर २०१७ मध्ये ते भारताच्या भेटीवर आले असता राहुल यांना भेटले होते. त्या वेळी राहुल गांधी यांनी या भेटीबद्दल ट्विट करीत अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी फलदायी चर्चा झाली. त्यांना पुन्हा भेटायला आवडेल, असे म्हटले होते. त्यांनी ओबामा यांच्याबरोबर काढलेले छायाचित्रही पोस्ट केले होते. 

मनमोहनसिंग यांचे कौतुक 
ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या २००९-२०१७ या काळात भारतात काही काळ मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेवर होते. ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात मनमोहनसिंग यांचे कौतुक केले आहे. त्यांच्यामध्ये एक प्रकारची गाढ निष्ठा आहे. अमेरिकेचे तत्कालीन संरक्षण मंत्री बॉब गेट्स यांच्याबाबतही त्यांनी कौतुकोद्‍गार काढले आहेत. 

पुतीन यांचे तगडे व्यक्तिमत्त्व 
‘न्यूयॉर्क टाईम्स’मधील वृत्तानुसार ओबामा यांनी व्लादिमीर पुतीन यांचे वर्णन मजबूत व्यक्तिमत्त्व आणि कोणत्याही कठीण काळात योग्य दिशा नेतृत्व असे केले आहे. ‘शारीरिकदृष्ट्या ते अतुलनीय आहे, त्यांनी म्हटले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्यो बायडेन सभ्य माणूस 
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळविलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे सभ्य माणूस असल्याचे ओबामांनी म्हटले आहे. 

‘ओबामांनी माफी मागावी’ 
ओबामा यांनी त्यांच्‍या आत्मवृत्तात राहुल गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या उल्लेखाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. ओबामा यांनी राहुल यांच्याबद्दल असे शब्द कसे वापरले, असा प्रश्न भारतीय नेटकऱ्यांनी विचारला आहे. यासंदर्भात आक्षेप नोंदवताना ओबामा यांनी माफी मागावी अशी मागणी काही जणांनी केली आहे म्हटलं आहे. याबाबत #माफ़ी_माँग_ओबामा हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेण्ड होता 

loading image
go to top