Rahul Gandhi: ''मतदार यादीतून ६५ लाख जणांची नावे वगळली'', बिहारमध्ये राहुल गांधींनी सांगितली आकडेवारी
‘‘आम्ही भाजप आणि निवडणूक आयोगाचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र, हरियाना आणि कर्नाटकमध्ये त्यांनी मतांची चोरी केली. आता तेच प्रकार बिहारमध्ये करण्याचा त्यांचा डाव आहे; पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही,’’
सीतामढी, ता. २८(पीटीआय) : ‘‘बिहारमधील सुमारे ६५ लाख गरीब आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत,’’ असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.