
सरकार विरोधात बोलल्यानंतर कारवाई सुरु होत आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे - राहुल गांधी
देशातील काँग्रेसनं 70 वर्षांत जे कमावलं ते भाजपानं 8 वर्षात संपवल; राहुल गांधींचा घणाघात
भारतात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशातील काँग्रेसनं मागील सत्तर वर्षांत जे कमावलं ते भाजपानं आठ वर्षात संपवलं आहे, असा घणाघात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे. सध्या केंद्र सरकारवर टीका करण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. लोकशाहीची सुरु असलेली हत्या जनता पाहत आहे. सरकार विरोधात बोलल्यानंतर कारवाई सुरु आहे हे लोकशाहीला घातक आहे, असंही राहुल गांधीनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: गुजरात काँग्रेसमध्ये जिग्नेश मेवाणीमुळे नाराजीनाट्य, दोन दिग्गजांनी सोडला 'हात'
यावेळी बोलताना गांधी यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रांना खोटं ठरवण्यापर्यंत केंद्र सरकारची मजल गेली आहे. देशात दिवसेंदिवस महागाईचे आकडे वाढत आहेत. वाढते महागाईचे आकडे अर्थमंत्र्यांना दिसत नाहीत का?, असा सवालही त्यांनी यावेळी केली आहे. कोरोना काळातील मृत्यूची आकडेवारी केंद्राकडून लपवली का जाते? स्टार्टअप इंडिया कुठे आहे? असेही काही सवाल त्यांनी मोदी सरकारला केले आहेत.
पुढे ते म्हणाले, मी सत्य बाहेर आणतो म्हणून माझ्यावर कारवाई करतात, मात्र मी बोलत राहणार असंही राहूल गांधींनी खडसावून सांगितल आहे. माझी भूमिका आक्रमक आहे. या भूमिकेद्वारे मी देशातील जनतेच्या प्रश्नांना तोंड फोडण्याच काम करणार आहे. सध्या भारतीय नागरिक महागाई, बरोजगारी यांबद्दल लढणार आहे. या विरोधात बोलल्यानंतर माझ्यावर पलटवार होणार आहेत, मात्र तरीही बोलत राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: Health Tips: शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी ट्राय करा 'हे' सुपरफूड
Web Title: Rahul Gandhi Criticism To Modi Govt On Democratic And Central Govt Various Points
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..