'हेट इन इंडिया' आणि 'मेक इन इंडिया' एकत्र राहू शकत नाही : राहुल गांधी

Rahul Gandhi on PM Modi
Rahul Gandhi on PM Modie sakal

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षात जागतिक ऑटोमोटिव्ह बँड्सने भारतातून काढता पाय घेतला आहे. त्यावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) निशाणा साधला आहे. 'हेट इन इंडिया आणि मेक इन इंडिया एकत्र राहू शकत नाही' असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi on PM Modi
PM मोदी ३ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर, यंदाची पहिली विदेशवारी

राहुल गाधींनी एक इन्फोग्राफिक शेअर केला आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षांत भारतातून बाहेर पडलेले सात ऑटोमोटिव्ह ब्रँड दाखवले आहेत. 2017 मध्ये शेवरलेट, 2018 मध्ये मॅन ट्रक्स, 2019 मध्ये फियाट आणि युनायटेड मोटर्स, 2020 मध्ये हार्ले डेव्हिडसन, 2021 मध्ये फोर्ड आणि 2022 मध्ये डॅटसन हे ब्रँड भारतातून बाहेर नेण्यात आले. ७ जागितक ब्रँड्स, ९ कारखाने, ६४९ डीलरशिप्स आणि ८४ हजार नोकऱ्या देशाबाहेर नेण्यात आल्या, असं राहुल गांधी म्हणाले. तसेच आता पंतप्रधान मोदींनी विनाशकारी असलेल्या बेरोजगारीच्या संकटावर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे.

मार्च महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर 7.60 टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार, जानेवारी आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे 6.57 टक्के आणि 7.91 टक्क्यांच्या तुलनेत भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारीमध्ये 8.10 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशभरातून विशेषतः एप्रिल महिन्यात रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या प्रसंगी धार्मिक मिरवणुकांमध्ये हिंसाचार आणि जातीय संघर्षाच्या अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यावरून राहुल गांधींनी हेट इन इंडिया असं म्हटलं आहे. तसेच याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह १३ विरोधी नेत्यांनी लोकांना शांतता आमि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र मौन धारण केले असून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com