
कोझीकोड : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबतची भूमिका ही पक्षपाती स्वरूपाची असून वायनाडमधील भूस्खलनपीडितांना मात्र मदतीपासून वंचित ठेवले जात आहे’, अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज केली. ते येथे आयोजित सभेत बोलत होते. खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रियांका गांधी या आज प्रथमच वायनाडमध्ये आल्या होत्या. या सभेतील त्यांची उपस्थिती देखील लक्षवेधी ठरली.