esakal | Video : जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींनी दिला 'जय माता दी'चा नारा
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Video : जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींनी दिला 'जय माता दी'चा नारा

sakal_logo
By
सुधीर काकडे

काँग्रेसनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या दोन दिवसीय जम्मू-काश्मिर (Jammu and Kashmir) दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी यावेळी आपण काश्मिरी पंडीत असल्याचे म्हणत, वैष्णोदेवी मंदीर आपल्याला घरासारखे वाटत असल्याचे विधान केले. तसेच राहुल गांधी दोऱ्यादरम्यान घेतलेल्या सभेत उपस्थितांना ‘जय माता दी’चे नारे (chant of Jai Mata Di) देखील लावण्यास सांगितले. त्यावेळी लोकांनी हा नारा न दिल्याचे पाहिल्यावर राहुल गांधींनी त्यांना पुन्हा नारा लावण्यास सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या या दौऱ्यादरम्यान लोकांशी संवाद साधला. ‘मी जेव्हा इथे येतो तेव्हा मला घरी आल्या सारखे वाटते, माझ्या कुटूंबाचे जम्मू-काश्मिरसोबत चांगले संबंध जुने संबंध आहेत असे गांधी यांनी यावेळी सांगितले. तसेच पुढे ते असेही म्हणाले की, माझे कुटूंब एक काश्मिरी पंडीत कुटूंब आहे. राहुल गांधी यांनी या दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात जय माता दी, जय माता दी असा नारा दिला. त्यांनी हा नारा दिल्यानंतर उपस्थितांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा राहुल गांधींनी त्यांना पुन्हा नारा देण्यास सांगितल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमधून दिसुन येते आहे.

हेही वाचा: राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी MIM खासदार ओवैसींवर गुन्हा

दरम्यान, जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा दुसरा दौरा आहे. मी नक्कीच काश्मिरी पंडीतांसाठी काम करेल असे आश्वासन राहुल गाधी यांनी यावेळी जनतेसा दिले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘जम्मू काश्मिरसाठी माझ्या हृदयात वेगळे स्थान आहे. इथे बंधुभाव आहे, मात्र भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करता आहेत’ असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला.

loading image
go to top