दोन राज्यांत निवडणुका असताना राहुल गांधी बँकॉकला

वृत्तसंस्था
Sunday, 6 October 2019

राहुल गांधी हे बँकॉकला गेले असून, तेथून ते 10 ऑक्टोबरला भारतात परतणार आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाना राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बँकॉकला सहलीसाठी गेल्याचे समोर येत आहे. काँग्रेसच्या अडचणीच्या काळातच प्रमुख नेता सहलीवर जात असल्याने टीका करण्यात येत आहे.

झी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी हे बँकॉकला गेले असून, तेथून ते 10 ऑक्टोबरला भारतात परतणार आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. देशातील सर्वांत जुन्या पक्षाचे नेतेच पक्ष अडचणीत असताना सहलीला जात असल्याने नेटिझन्सनेही त्यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे आता राहुल गांधी उशिरा या दोन्ही राज्यांमध्ये प्रचार करताना दिसणार आहेत.

हरियानात काँग्रेसला मोठा झटका बसला असून, राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील समजल्या जाणाऱ्या अशोक तंवर यांनी राजीनामा दिला. हरियानात तिकीट वाटपावरून ते नाराज होते. तसेच त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनही केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi goes to Bangkok as Congress faces tough battle in Maharashtra and Haryana