
नवी दिल्ली : बिहारमधील मतदारयाद्यांच्या फेरतपासणी मोहिमेला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने आज संसदेबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच संसदेत आक्रमक घोषणाबाजी करून लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी देशात निवडणुकीची चोरी सुरू असल्याचा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा पुन्हा एकदा आरोप केला.