Rahul Gandhi: राहुल गांधींनी घेतली लिंगायत पंथाची दीक्षा; राजकीय समीकरणे बदलणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

Rahul Gandhi: राहुल गांधींनी घेतली लिंगायत पंथाची दीक्षा

बंगळूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज कर्नाटक दौरा केला आहे. यावेळी त्यांनी चित्रदुर्ग येथील श्री मुरूगा मठाला भेट दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी लिंगायत पंथाची दीक्षा घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका वर्षभर राहिल्या असताना कर्नाटकमधील राजकीय समीकरणे बदलाला बळ मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

"श्री जगद्गुरु मुरुगराजेंद्र विद्यापीठाला भेट देणे आणि डॉ. श्री शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांच्याकडून 'इष्टलिंग दीक्षा' प्राप्त करणे ही अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. गुरु बसवण्णांची शिकवण चिरंतन आहे आणि याबद्दल मठातील शरणारूकडून जाणून घेतली." असं राहुल गांधी यांनी ट्वीट करत सांगितलं आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे काँग्रेस सध्या या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करत असून राहुल गांधी यांनी कर्नाटकचा दौरा केला आहे. त्यातच कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या मोठी असल्यामुळे त्यांच्या मताची टक्केवारी वाढण्यासाठी राहुल गांधी यांनी दीक्षा घेतली असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला याचा फायदा होऊ शकतो.

Web Title: Rahul Gandhi Initiated The Lingayat Sect Karnataka Before Assembly Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..