Rahul Gandhi : राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही - काँग्रेस सूत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही - काँग्रेस सूत्र

नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी सध्या 'भारत जोडो' यात्रेवर असून विविध राज्यांमधून त्यांचा प्रवास सुरु आहे. (Rahul Gandhi is unlikely to contest presidential election says Congress sources)

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दिल्लीमध्ये पार पडणार आहे. पण राहुल गांधी आपली 'भारत जोडो' यात्रा अर्ध्यावर सोडून निवडणुकीसाठी दिल्लीला जाणार नाहीत. सध्या ही यात्रा केरळमध्ये असून २९ सप्टेंबर रोजी ती कर्नाटकात प्रवेश करेल. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्यााची ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळं राहुल गांधी अध्यक्षपादाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांची दिली आहे.

शशी थरुर यांच्या गळ्यात पडणार अध्यक्षपदाची माळ?

दरम्यान, राहुल गांधींची सध्या पक्ष बांधणीसाठी देशभरात यात्रा सुरु आहे. दुसरीकडं शशी शरुर काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी कालच सोनिया गांधींची देखील भेट घेतली. या भेटीनंतर सोनिया गांधींनी त्यांना निवडणुकीसाठी परवानगीही दिली आहे. तर दुसरीकडं सुरुवातीपासून अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा होती. पण आपल्याला राज्यातून बाहेर पडायचं नसल्याचं सांगत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळं गेहलोत आणि राहुल गांधी हे दोन्ही जर ही निवडणूक लढवणार नसतील तर अध्यक्षपदाची माळ शशी थरुर यांच्याच गळ्यात पडू शकते.

Web Title: Rahul Gandhi Is Unlikely To Contest Presidential Election Says Congress Sources

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..