
नवी दिल्ली : येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठीचे विधेयक मांडण्यात यावे, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.