VIDEO...अन् राहुल गांधी यांनी स्वतःला मारले चाबकाचे फटके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

VIDEO...अन् राहुल गांधी यांनी स्वतःला मारले चाबकाचे फटके

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे. ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करण्याआधी राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ते स्वतःला चाबकाने फटके मारत आहेत. (Rahul Gandhi Lashes Himself While Attending Bonalu Festival Video Goes Viral )

‘भारत जोडो’ यात्रेच्या ट्विटर हँडलवर काँग्रेसकडून अनेक गोष्टी शेअर करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही भावनिक क्षण पाहायला मिळाले. आजचा भारत जोडो यात्रेचा ५७ वा दिवस आहे. दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये, राहुल गांधींना लोकांनी घेरले आहे. हातात चाबूक असलेले काही लोक उपस्थित आहेत, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यापैकी एक स्वत:ला चाबकाने मारतो. यानंतर, व्हिडीओमध्ये पुढे राहुल गांधी हातात चाबकाने स्वत:ला मारताना दिसत आहेत.

सध्या राहुल गांधी यांची ही यात्रा तेलंगणा येथे आहे. . तिथे सध्या मान्सून उत्सव सुरू आहे. त्याला बोनालु म्हणून ओळखले जातात. या उत्सवात, स्थानिक तरुण त्यांच्या अंगावर आणि चेहऱ्यावर लाल रंगाने हळद आणि चंदनाची लेप लावतात. डोळ्यात काजळ घालतात, पायात वाळा घालतात आणि गालाजवळ तोंडात लिंबू दाबतात. लोकांना चाबूक मारण्यासाठी ते दोन जड दोर उचलतात आणि जीभ बाहेर काढतात, त्यांना पोथराज म्हणतात. या तिथल्या पारंपारिक उत्सवात राहुल गांधी यांनी भाग घेतला आहे.

जाणून घ्या काय आहे बोनालू सण?

महाकाली बोनालू उत्सव तेलंगाणामध्ये उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवामध्ये देवी महाकालीची पूजा केली जाते. हा सण आषाढ महिन्यात साजरा केला जातो. या सणावेळी महिला डोक्यावर घट घेऊन मिरवणुकीतून दर्शनाला जातात. तेथे डोक्यावर घट घेऊन देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते.

बोनालूच्या घटामध्ये हळदीचे पाणी भरलेले असते. त्यावर निंबाची पानं आणि वर एका छोट्या घटामध्ये ज्योत पेटवलेली असते. बोनालू उत्सवादरम्यान, महिला 'पोतराजांच्या' नेतृत्वाखाली मिरवणुकीत मंदिरात जातात, जे ढोलाच्या तालावर हिंसकपणे नाचतात आणि गर्दीला फटके मारतात. पोथराज हा सात बहिणींचा भाऊ मानला जातो आणि हिंदू देवी महाकालीच्या विविध रूपांपैकी एक आहे. या मध्ये बोनालू एक प्रमुख व्यक्ती आहे जी देवी महाकालीचा भाऊ आहे आणि देवीच्या रक्षणासाठी चाबूक चालवतो.

टॅग्स :Rahul GandhiCongress